देवळाई परिसरात विसर्जन तलावालगत मोकळ्या जागेवर ३० वर्षीय महिलेचा दगडाने ठेचुन खून करण्यात आल्याची घटना काल सायंकाळी उघडकीस आली. अर्धनग्न अवस्थेत रक्ताने माखलेला अनोळखी मृतदेह पोलिसांना मिळून आला त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. चिखलठाणा पोलिसांनी सहा तासात अनोळखी महिलेची ओळख पटवुन, आरोपीला जेरबंद केले आहे. आरोपीने महिला शरिर सुखास नकार देत असल्यामुळे खुन केल्याची कबुली दिल्याची माहिती माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी सांजवार्ताशी बोलताना दिली आहे.
संजय निबोंरे (वय २३ वर्षे) रा. मिसारवाडी असे खुन करणार्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीवरुन, संजय आणि गोदावरी खडसे (३०) रा. हनुमाननगर या सिडको बसस्टॅड परिसरातील साईराज नावाच्या प्रिंटिंगच्या दुकानावर कामाला होते. तेथे त्यांची ओळख झाली. संजय यांने दोन ते तीन वेळस महिलेसोबत बळजबरी करण्याचा प्रयत्न केला होता. दोन दिवसांपूर्वी दुकानातुन जाताना सजंयने महिलेला घरी सोडतो म्हणुन आपल्या दुचाकीवर बसवुण घराकडे न जाता, देवळाई कडे घेऊन गेला. तेथे महिलेसोबत बळजबरी करण्यासाठी प्रयत्न करीत होता. तु माझ्या सोबत शरिर संबध का ठेवत नाहीस म्हणुन त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. त्यातुनच त्यांने महिलेच्या डोक्यात दगड घातला. महिला रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसताच, त्याने चेहरा जाळण्याचा प्रयत्न केला. आणि घटनास्थाळावरुन पळ काढला. चिकलठाणा पोलिसांनी रात्री खुनाचा गुन्हा दाखल करुण घेतला. तपासाची चक्रे फिरवत सहा तासात मृत महिलेची ओळख पटवुन आरोपीला अटक केली आहे. सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश गांवडे, पोलीस उपअधीक्षक अशोक आम्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले, संजय आहेर, जमादार राठोड, देशमुख, सोपान टकले, सुनिल गोरे, दिपक इंगळे, अर्जुन राठोड, दिपक सुरासे महिला पोलीस सरला माने यांनी केली.